एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एअरलाइन्स कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता, पण ही धमकी खोटी ठरली. एका अधिकारींनी सांगितले की, मंगळवारी रात्री नवी दिल्ली ते विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती, परंतु विशाखापट्टणममध्ये उतरल्यानंतर चौकशी केल्यानंतर ती अफवा असल्याचे आढळून आले.
विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना बॉम्बची धमकी देणारा कॉल आला आणि एअरलाइन आणि विशाखापट्टणम विमानतळाला सतर्क करण्यात आले होते. रेड्डी म्हणाले की विमान सुरक्षितपणे उतरले आणि सखोल तपासात हा खोटा कॉल असल्याचे समोर आले. ते म्हणाले की, विशाखापट्टणमला जाणाऱ्या विमानात 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना उतरवून तपासणी केल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही, असे संचालकांनी सांगितले.