आपल्या देशात पहिल्यांदा पोलिस संपावर गेले आहेत. यामध्ये त्यांनी पगारात होणा-या कपातीच्या विरोधात राजस्थान पोलीस दलातील जवळपास 250 कॉन्स्टेबल एक दिवसाच्या सुट्टीवर आहेत. संप करत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. प्रकरण असे आहे की कॉन्स्टेबल्सना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहाव लागणार होते . यावेळी मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिले आहे. त्यामुळे दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून हे गार्ड ऑफ ऑनर करवून घेतले होते. यामध्ये कारण विचारले असतात त्यांनी सांगितले की पगारात होत असलेली कपात याचा निषेध त्यांनी केला आहे.
जोधपूर पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 250 हून जास्त पोलीस कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. यामध्ये हे सर्व कर्मचारी सुट्टी मंजूर झाली नसतानाही सुट्टीवर गेले. यामधील काहीजणांना राजनाथ सिंह यांना सलामी देण्याची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. अखेर आम्हाला नाईलाजाने दुस-या पोलीस कर्मचा-यांकडून सलामी द्यावी लागली. त्यामुळे आता सरकारच्या अनेक धोरणाचा विरोध सुरु झाला अआहे असे चित्र उभे राहत आहे.