पंतप्रधान व अमित शहा यांच्या वक्तव्याचा विरोधात पकोडे विकून निषेध

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (16:01 IST)

भाजपा सरकाने देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देऊन प्रवाहात आणणे गरजेचे असताना उलट तरुणांना पकोडे विकण्याचा व्यवसाय करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे तरुणांमध्ये भाजपा सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे  यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भाजपा नेत्यांच्या नावाचे पकोडे विकत निषेध नोंदविण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे रस्त्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पकोडे विक्रीचा स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलवर मोदी पकोडा १०० रुपये, अमित शहा पकोडा ५० रु., आणि देवेंद्र फडणवीस पकोडा ३० रु. तर विनोद तावडे पकोडा १० रुपये दराने विकण्यात आला.

पंतप्रधान मोदींनी भारतातील रोजगार निर्मितीच्या प्रश्‍नास उत्तर देताना म्हटले होते की जो पकोडे विकतो अशा व्यक्तीला दररोज २०० रुपये मिळतात. असे सांगून तरुणांना नोकर्‍या देण्यापासून वंचित ठेवण्याची एकप्रकारे भूमिका घेतली आहे व शिक्षित तरुणांचा एकप्रकारे अपमान केला आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा पकोडे विकून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, शरद क्रिडा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कसबे, अमोल चव्हाण, अभय पासले, फैजल इनामदार, अंकुश गायकवाड, अमर मदने, गणेश भोसले, प्रसाद भोसले, विजय कदम, अनिकेत कापसे, गणेश घोडके, गौस करमाळकर, सचिन साळुंखे, बाळू ननवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित माहिती

पुढील लेख