पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट भागात मोठ्या प्रमाणात ड्रोन-प्रति-कार्यवाही दरम्यान ५० हून अधिक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. या कारवाईत एल-७० तोफा, झू-२३ मिमी तोफा, शिल्का सिस्टीम आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
तसेच भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, आज आणि उद्या जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार होत आहे, त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
आता पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डही त्यांच्या उद्धटपणाची शिक्षा भोगत आहे. भारतासोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे पीसीबीने शुक्रवारी पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती समोर आली आहे.