गायीच्या पोटातून तब्बल 80 किलो प्लॅस्टिक काढले

मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:23 IST)

बिहारमध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 80 किलो प्लॅस्टिकचा कचरा काढण्यात आला आहे. पटनाच्या पशुवैद्यकिय महाविद्यालयातील ही घटना आहे. येथे सहा वर्ष वय असलेल्या एका गायीला आणण्यात आलं होतं. अनेक दिवसांपासून या गायीने खाणं बंद केलं होतं. त्यांनंतर  तीन तासांच्या ऑपरेशननंतर गायीच्या पोटातून प्लॅस्टिकचा डोंगर काढला.  सध्या त्या गायीची प्रकृती स्थिर आहे. यावेळी भारतात गायींनी रस्त्यावर फिरताना प्लॅस्टिक खाणं सामान्य गोष्ट आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक निघणं असामान्य होतं असं डॉ. जीडी  सिंह यांनी सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती