भोपाळमधील हनुमानगंज ठाण्यातील पोलिसांनी पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमधून त्यांना अटक केली. नामदेव यांना राज्य शिलाई कला विभागाच्या उपाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं असून बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मंत्री महोदय आपल्याला फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. राजेंद्र नामदेव यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. दुसरीकडे विरोधकही भाजपावर तुटून पडले आहेत. त्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे.
यामध्ये पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, 18 जून 2016 ला सिवनी येथील तरुणीवर अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात तिला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन देत मंत्री राजेंद्र नामदेव यांनी तरुणीजवळ येण्याचा प्रयत्न केला होता. तर तिला नोकरीचं आमिष दाखवल होते . जवळपास चार महिन्यांपूर्वी 11 नोव्हेंबर 2017 ला त्यांनी राजदूत हॉटेलमधील खोली क्रमांक 106 मध्ये तिला बोलावलं होतं. यावेळी त्यांनी अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंत्री आणि सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.