काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये काही दिलासादायक बदल केले आहेत. यात आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचं नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळेल. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
सोबतच कॉलमची संख्या घटवून ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो. विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही.