अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल म्हणाले की, हे मंदिर 10 एकरपेक्षा जास्त जागेवर बांधण्याची योजना आहे आणि यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यासाठीची जमीन अद्याप निवडलेली नाही.
दयाल यांच्या म्हणण्यानुसार, संग्रहालयात मंदिराचे विविध पैलू जसे की त्याची रचना, बांधकाम इत्यादी दर्शविणारी स्वतंत्र गॅलरी असेल.
अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने संग्रहालयासाठी विस्तृत कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. हिंदू धर्म आणि त्याचा वारसा याबद्दल जागरुकता आणणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे, तसेच तत्त्वज्ञान, धार्मिक व्यक्तिमत्त्वे, धार्मिक केंद्रे, हिंदू तीर्थस्थळेही येथे प्रदर्शित केली जाणार आहेत.
तीर्थक्षेत्र असलेल्या अयोध्या शहरात किमान ६००० मंदिरे आहेत आणि साधारण दिवसात सुमारे तीन लाख लोक येथे भेट देतात हे उल्लेखनीय. मकर संक्रांती, रामनवमी, सावन झुला मेळा, चौदा कोसी परिक्रमा, पंच कोशी परिक्रमा आणि दिवाळी या दिव्यांच्या सणांमध्ये येथे येणाऱ्यांची संख्या सुमारे १० लाखांपर्यंत जाते.