ISRO Aditya L1 Mission Launched भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-1 लाँच
शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (11:56 IST)
ISRO Aditya-L1 Mission इस्रोने आपली पहिली सूर्य मोहीम 'आदित्य-एल1' लाँच केलं आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 11:50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आली. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.
भारताची सूर्याकडे जाणारी ही पहिली मोहीम असून याद्वारे अवकाशात एक वेधशाळा उभारण्यात येणार आहे, जी पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या या ताऱ्याचं निरीक्षण करेलं आणि 'सोलर विंड'सारख्या अवकाशातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करेल.
ISRO ची पहिली सूर्य मोहीम आदित्य L-1 (ISRO Sun Mission Live Updates) अंतराळातील 'लॅगरेंज पॉइंट' म्हणजेच L-1 कक्षेत ठेवली जाईल. यानंतर हा उपग्रह २४ तास सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास करेल. L-1 उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल.
सूर्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल?
हे यान प्रत्यक्षात सूर्याजवळ जाणार नाही.
आदित्य L1 ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतर गाठायचं आहे. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या चौपट आहे परंतु ते फारच किरकोळ आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या फक्त 1% आहे.
पृथ्वीपासून सूर्याचं अंतर 15.1 कोटी किलोमीटर आहे.
एका आठवड्यापूर्वी शुक्र ग्रहावरून गेलेल्या नासाच्या पार्कर अंतराळयानाशी तुलना केल्यास पार्कर सूर्याच्या पृष्ठभागाच्या जवळून 61 लाख किलोमीटर अंतरावरून जाईल.
पण आदित्य L1 ला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून वेळ लागेल.
इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती दिली आहे, "आदित्य एल-1 ला प्रक्षेपणापासून L1 (लॅग्रेंज पॉइंट) पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चार महिने लागतील."
त्यामुळे प्रश्न पडतो की सूर्य तिथून इतका दूर आहे तर मग एवढा प्रयत्न का केला जात आहे?
यापूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) यांनीही याच उद्देशानं सूर्य मिशन केलं आहे.