तामिळनाडूच्या थेणी जिल्ह्यातील आंदीपट्टी भागात शनिवारी एका स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह 17 जण गंभीर जखमी झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार थेनीचे पोलिस अधीक्षक शिव प्रसाद यांनी सांगितले की, बस कन्याकुमारी जिल्ह्यातून थेणी जिल्ह्यात फिरण्यासाठी जात होती. तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढील उपचारासाठी थेणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.