मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास तीन तरुणी आणि चार तरुण असलेली ही ऑडी कार बेंगळूर येथील इंदिरा नगर भागातून वेगाने जात असताना चालकाचे कार वरील नियंत्रण अचानक सुटल्याने कार इंदिरानगरच्या फुटपाथावर जोरानं आदळली.ही धडक इतकी जोरदार होती की या आलिशान ऑडी गाडीचा चक्काचूर झाला आहे.या मध्ये बसलेल्या सात जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका ने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.