केरळला 500 कोटींची तातडीची मदत जाहीर

शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (14:49 IST)
केरळमध्ये आलेल्या महापुरात तीनशेहून अधिक बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तर अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांचाशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला दिली 500 कोटींची तातडीची मदत जाहीर केली. याआधी 100 कोटींची मदत देण्यात आली होती. याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.  
 
सदरच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी 2 हजार कोटींची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधानांनी 500 कोटींची मदत देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमध्ये 19 हजार 512 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे केरळ मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती