या फोटोत कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुसळधार पावसात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. इलेक्टीक विभागातील चार कर्मचारी डोक्यावर सुरक्षा टोपी आणि अंगावर रेनकोट घालून धो-धो कोसळणाऱ्या पावसात ड्युटी बजावत आहेत. स्वत:ला दोरखंडाशी बांधून घेत वीजेचा प्रवाह सुरू करण्याचा अन् राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. सध्या, सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल होत आहे. नेटीझन्सकडून या कर्मचाऱ्यांना जवांनाची उपमा देण्यात येत आहे. सीमेवर जवान लढत आहेत, तर केरळातही वीज कर्मचारी जवानांप्रमाणेच काम करत आहेत, असा संदेशही लिहिण्यात येत आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना नेटीझन्सकडून सॅल्यूटही करण्यात येत आहे.