मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 2 लाख लोकं बेघर झाले आहेत. जोरदार पावसामुळे आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झाल्याचे समोर आले आहे. व्यवसाय, पिक व इतर सुविधांची हानी होत आहे. इकडे हवामान खात्यानं राज्यातील पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.