मिळालेल्या माहितीनुसार आपल्या पुरुष सहकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दोन महिला पोलीस हवालदारांनी गुरुवारी उत्तर गोव्यातील कोलवळे येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून कॉन्स्टेबल प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे.
तसेच कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर गुन्हे शाखेने 4 नोव्हेंबर रोजी दोघी महिला पोलीस हवालदारांना अटक केली होती. गावडे यांनी 25 ऑक्टोबर रोजी झुआरी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओ संदेशात गावडे यांनी दोन महिला कॉन्स्टेबल आणि अन्य एका पुरुषावर छळ केल्याचा आरोप केला होता. प्रचंड मानसिक तणावामुळे हे पाऊल उचलत असल्याचे गावडे यांनी सांगितले होते. तसेच कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या आरोपाखाली या महिला पोलीस हवालदारांना अटक करण्यात आली होती.