गोव्यात मोठा अपघात टळला, उड्डाण करण्यापूर्वी विमान पक्ष्याला धडकले; प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (11:11 IST)
गोवा मधील डाबोलिम विमानतळावरून मुंबईला जाणारी एयर इंडियाची फ्लाइटसोबत बर्ड स्ट्राइकची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी एक पक्षी विमानाला धडकला.यामुळे उड्डाण रद्द करावे लागले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 6.45 वाजता घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा फ्लाइट रनवे वर होती, तेव्हा पक्षी विमानाला येऊन धडकला. यानंतर विमान थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेची चौकशी सुरु आहे. 
 
विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की,‘‘दक्षिण गोवाच्या दाबोलिम विमानतळावरून विमान मुंबईसाठी उड्डाण करणार होते, पण पक्षाची धडक झाल्याने रनवे वर विमान थांबवावे लागले. तसेच पुढील विमानाच्या चौकशीसाठी विमान परिसरात थांबवावे लागले. 
 
विमानाची जेव्हा पक्षीसोबत धडक होते तेव्हा त्याला बर्ड स्ट्राइक म्हणतात. बर्ड स्ट्राइक अनेक वेळेस संकट सुद्धा निर्माण करते. तसेच पक्षी विमानाला धडकल्यानंतर पायटलचे विमानावरील नियंत्रण सुटू शकते. तसेच जर पक्षी इंजिनमध्ये फसला तर इंजन फेल होण्याचे संकट येऊ शकते. जर विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी अडकला तर इंजिनमध्ये आग देखील लागू शकते. 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती