मिळालेल्या माहितीनुसार प्रभास कलंगुटकर हा 7 वर्षाचा चिमुरडा त्याच्या आईसोबत फिरत असताना 'पिटबुल'ने त्याच्यावर हल्ला केला, व 'पिटबुल' याला पट्ट्याने बांधलेले नव्हते. पोलीस अधिकारींनी सांगितले की, मुलाला गोवा रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्याचा मृत्यू झाला.
तसेच पशुसंवर्धन मंत्री नीलकांत हलर्णकर म्हणाले की, राज्य सरकारने काही आक्रमक कुत्र्यांच्या पैदाशीवर बंदी घातली होती, पण त्यांच्या मालकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. तसेच काही धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.