हिंमत असेल तर ठाकरेंना अटक करा- अमरसिंह

वेबदुनिया

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:34 IST)
राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून चोवीस तास उलटले. अद्याप त्यांना अटक केली नाही. उलट समाजवादी पक्षाचे लोक जरा जास्त बोलतात असे आर. आर. पाटील म्हणतात, आमच्यावर टीका करण्यापेक्षा पाटील यांनी हिंमत असेल तर राज ठाकरेंना अटक करून दाखवावी असे उघड आव्हान समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना दिल्याने या प्रकरणाला आता राजकीय रंग चढत असल्याचे दिसत आहे.

अमराठी टॅक्सीचालकांना मारहाण केल्याविरोधात आपण तक्रार दाखल करण्यास पोलिसठाण्यात गेलो, तर पोलिस आपल्याला साहाय्य तर करतच नाहीत, उलट आम्हालाही भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकाखाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुंबई पोलिसांवरही टिका केली. मुंबई सर्व देशवासीयांची आहे. असे असताना अमराठी लोकांवर होणारे हल्ले हे भ्याड असल्याचेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा