महाराष्ट्रात हिंसा हे कॉग्रेसचे षडयंत्र- भाजप

वार्ता

शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:55 IST)
महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंसेला मनसे आणि कॉग्रेस यांचे षडयंत्र कारणीभूत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पक्ष प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

मनसे आणि कॉग्रेस याकामी एकमेकांची मदत करत असल्याचेही ते म्हणाले. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नगरपालिकेत मनसे
आणि कॉग्रेसमध्ये आघाडी असून, कॉग्रेसने मनसे सोबतचे आपले संबंध आधी तोडावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा