दिल्लीत अरविंद केजरीवाल 'वॉल' बनून उभे ठाकले असून 'आप'च्या झाडूपुढे भाजप व काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाल्याचे आतार्पंतच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. या निकालांवर प्रतिक्रया देताना भाजपचे प्रदेशाध्क्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दोष देत तीनपेक्षा एकजरी जागा जास्त जिंकली तरी भाजपसाठी हा विजयच आहे, असे म्हटले आहे.
दिल्लीतील भाजपच्या या पराभवावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचा दाखला दिला. भाजपला पराभूत करण्यासाठी व सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात तडजोडीचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रातही पक्षाची विचारधारा बाजूला ठेवत काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला व सत्ता स्थापन केली. दिल्लीच्या निकालांकडेही मी तसेच पाहत आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने शेवटच्या चार दिवसांत शस्त्रे खाली टाकली. भाजपला पराभूत करण्यासठी काँग्रेसने आपली मते 'आप'कडे वळवली, असा दावा पाटील यांनी केला