मुंबईत आणखी दोन ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडले, आरोग्य मंत्रालय सतर्क

सोमवार, 6 डिसेंबर 2021 (20:01 IST)
सोमवारी संध्याकाळी मुंबईतील आणखी दोन लोकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट ची पुष्टी झाली आहे. या संख्येसह, महाराष्ट्रातील ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे. याशिवाय, देशात अशा नवीन संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या 23 झाली आहे.
भारतात ओमिक्रॉनच्या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जाणकार लोकांना पूर्ण खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील आणखी दोन लोकांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाली आहे. यानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
 जगात देखील कोरोना विषाणूचा हा नवीन व्हेरियंट नवीन नवीन देशांमध्ये पसरत आहे. भारतात आतापर्यंत ओमिक्रॉन च्या संसर्गाच्या 23 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यापैकी नऊ प्रकरणे राजस्थानमध्ये, 10 महाराष्ट्रात, कर्नाटकात दोन आणि दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आहे, आणि आणखी कोविड पॉझिटिव्ह लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय आहे, परंतु त्यांच्या नमुन्यांच्या अनुवांशिक चाचणीचे निकाल अद्याप आलेले नाही.  दिल्लीत गेल्या 24 तासात नमुन्यांची चाचणी कमी होऊनही संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती