अवकाळी पावसानंतर मुंबईत धुक्याची चादर

रविवार, 5 डिसेंबर 2021 (13:14 IST)
सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईत आज सकाळी धुक्याची चादर पसरली आहे. या मुळे हवामानात थंडावा जाणवत आहे. सध्या मुंबईत हवामान 90 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता, किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघणाऱ्यांनी धुक्याचा आनंद घेतला. मुंबईत बऱ्याच ठिकाणी धुके दाटल्यामुळे अत्यन्त खराब दृश्यमानता आहे. त्यामुळे गाडीच्या लाईट्स सुरु करून लोकांना मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यावरील गाड्यांचा वेग कमी करून वाहने काळजीपूर्वक चालविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. थंडीचा कडक तापमान घसरल्यामुळे वाढत आहे. धुके दाट असल्यामुळे काही अंतरावरचे काहीच दिसत नव्हते. धुक्याचा आनंद मुंबईकर घेत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती