ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाच सूत्री अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याबाबत माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसांत 35 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारी घेतली आहे.
- प्रवाशांची यादी सोपी व्हावी यासाठी साँफ्टवेअरची निर्मिती.
- ही यादी आपात्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डतील वॉररूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार.