पालघरमध्ये दोघांनी बंदुकीच्या धाकावर 45 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले

शनिवार, 11 जानेवारी 2025 (18:42 IST)
सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पालघर मध्ये दोन दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर सोनारांकडून 45 लाखांचे सोन्याचे दागिने लुटण्याची घटना घडली आहे. 

दोन अज्ञात दरोडेखोऱ्यानी एका 60 वर्षीय व्यक्तिवर हल्ला करत त्याचे दागिने लुटून पळ काढला. अशी माहिती शनिवारी एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना वसई शहरातील अग्रवाल भागात शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दुकान बंद करताना दोन व्यक्ती दुकानांत आले त्या आरोपींपैकी एकाने मास्क घातला होता. तर दुसऱ्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते. नंतर त्यांनी बंदुकीच्या धाकावर 45 लाखांचे दागिने चोरून तिथून पळ काढला. त्यांनी ज्वेलरच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात ज्वेलर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

दरोडेखोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलीस त्यांना पकडण्यासाठी अलर्ट आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती