मुंबईतील जे जे रुग्णालयातील गोळीबारचा मुख्य आरोपीला 32 वर्षानंतर अटक

सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (10:06 IST)
महाराष्ट्रातील मुंबई मधील 1992 मध्ये जे जे रुग्णालयात झालेल्या गोळीबाराततील मुख्य आरोपी त्रिभुवन सिंह उर्फ श्रीकांत राय रमापतीला अटक करण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी 1992 जे जे रुग्णालयातील गोळीबार प्रकरणातील एका आरोपीला उत्तर प्रदेशमधील मिर्जापुर कारागृहामधून अटक केली आहे. जिथे तो अन्य आरोपांखाली शिक्षा भोगत होता. तिथे तो वेगवेगळ्या नावांनी कैदी होता. 1992 मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तो देखील झखमी झालेला होता. व घटनास्थळून फरार झालेला होता. 
 
मुंबई क्राईम ब्रांच नुसार पकडला जाऊ नये म्हणून तो आपले नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.मुंबई पोलिसांनी त्याची ओळख पटल्यानंतर त्याला मिर्जापूर कारागृहामधून अटक करण्यात आली आहे.मुंबई न्यायालयाने या आरोपीला २५ आक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 
 
काय आहे प्रकरण?
मुंबई पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेल ने 1992 मध्ये प्रसिद्ध जे जे रुग्णालय गोळीबाराचा मुख्य आरोपी त्रिभुवन सिंह उर्फ श्रीकांत राय रमापतीला मिर्जापूर कारागृहामधून अटक केली आहे. 12 सप्टेंनंबर 1992 मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, पोलिसांना चौकशी दरम्यान एक माहिती मिळाली. हा आरोपी सिंह विचाराधीन नाव लावून कैदी म्हणून उत्तर प्रदेशच्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम युपी मध्ये दाखल झाली व आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला मुंबई मध्ये आणण्यात आले. तसेच त्याला मुंबई मधील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले व तिथे त्याला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती