राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) संसदीय मंडळाची बैठक मुंबईत झाली

रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (13:41 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्या पूर्वी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून लवकरच भाजप उमेदवार जाहीर करणार असे सांगण्यात आले आहे. 

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संसदीय मंडळाची बैठक मुंबईत शनिवारी पार पडली. या वेळी संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी या महिन्याच्या सुरुवातीला भाजप सोडून राष्ट्रवादीत (शरचंद्र पवार) प्रवेश केला होता.

अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटपाचा निर्णय लागले नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चन्द्र गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचा समावेश आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती