कोर्टाने विचारले सरकारला संस्थेवर बंदी प्रक्रिया कशी राबवता ?

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:40 IST)
जेव्हा एखाद्या गंभीर आरोप असलेल्या एखाद्या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार नेमकी काय प्रक्रिया राबवते, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सनातन या संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी करत हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
 
हिंदुत्ववादी सनातन संस्था व संस्थेच्या कार्यावर बंदी घालण्याचे केंद्र तसेच राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी करत अरशद अली अन्सारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक (यूएपीए) च्या कलम 3 नुसार सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सप्टेंबर 2018 साली राज्य तसेच केंद्र सरकारला सादर करण्यात आले, परंतु अद्यापही यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप अन्सारी यांनी याचिकेत केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती