बाप्परे, मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह थेट हाजिअलीच्या समुद्र किनारी सापडला

सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (17:21 IST)
मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा मृतदेह हाजिअलीच्या समुद्र किनारी आढळला आहे. शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. याच दरम्यान साचलेल्या पाण्यातून जात असताना शीतल भानुशाली उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. त्याच ठिकाणी त्याच्या हातातली पिशवी  सापडल्याने शीतल भानुशाली मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती मिळाली होती. 
 
घाटकोपर येथे राहणाऱ्या शीतल भानुशाली दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. नेहमी जाणाऱ्या रस्त्याने पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्याच रस्त्याने जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. आज त्यांचा मृतदेह हाजीआलीच्या समुद्र किनारी आढळला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती