कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत आहेत : फडणवीस

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (17:56 IST)
शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.
 
हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले.
 
संसदेने दोन बील पास केले ते पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेजमधून थेट माल विकता येत नव्हता. बाजार समितीत शेतकऱ्यांना कर द्यावा लागायचा. माल कुठे विकला जावा, किती किंमत असावी ? यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नव्हते. सिंगल मार्केट झाल्याने देशाच्या कोणत्या कोपऱ्यात माल विकायचा आणि किती किंमतीत विकायचा हे शेतकरी ठरवतील. त्यामुळे ही दोन्ही बीलं क्रांतीकारी असल्याचे फडणवीस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती