गणेशोत्सवाचा धुमाकूळ सध्या सर्वत्र आहे. मुंबईत तब्बल 13 हजाराहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या साहाय्याने पाळत ठेवली जाणार आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भरती आणि सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी काही अनुचित घडू नये या साठी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यासाठी पोलीस बंदोबस्त कडक तैनात केला आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी, शिपाई ,एसआरपी, जलद कृतिदल आणि होमगार्डचे जवान तैनात केले आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. बेकायदेशीर काम केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.गणेश मूर्तीचे विसर्जनानंतर फोटो काढण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लन्घन केल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना -
दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवस आणि अकरा दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करताना वाद्य, लाउड्स्पिकरच्या आवाजाच्या पातळीत शिथिलता असेल. तसेच पोलिसांनी लोकांना इतर वेळी लाउड्स्पिकराच्या आवाजाच्या पातळीचे निर्बंध दिले असून त्यांच्या पालन करण्याचे आवाहन केले आहे.