Shocking Video ट्रेनच्या दाराला लटकलेला तरुण उडाला Mumbai Local Train Accident

Webdunia
शुक्रवार, 24 जून 2022 (09:51 IST)
रेल्वे अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत असलेल्या तरुणाचा वेगाने उडल्याचा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे स्टंट करु नये असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येतं तरी अपघात घडतं आहे.
 
रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केलं जात असतं तरी काही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करतात. 
 
या व्हिडिओत चालत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणारा तरुण वेगाने फेकला जातो असे दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण रेल्वेतून खाली पडला. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख