नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 6 महिलांची सुटका, 3 जणांना अटक

शनिवार, 12 एप्रिल 2025 (18:29 IST)
नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. हे रॅकेट एका लॉज मध्ये सुरु होते. सदर माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिली. 
ALSO READ: ठाण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्या कडून शाळकरी मुलीचा लैंगिक छळ, आरोपीला अटक
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका लॉजिंग आणि बोर्डिंग सुविधेवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात तिघांना अटक केली असून 6 महिलांची सुटका करण्यात आली आहे. 
 
गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने गुरुवारी पनवेल मध्ये कोन येथील नारपोली परिसरातील एका जागेवर छापा टाकला. पोलिसांनी बनावट ग्राहकाचा रूप घेऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला.
या प्रकरणात लॉजच्या व्यवस्थापक आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. 
ALSO READ: मुंबईत भारतातील पहिले आयआयसीटी असेल,सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल कार्ड सिस्टम सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
या बेकादेशीर कृत्यात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 370  (2) मानवी तस्करी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: 'मी मूर्खांना उत्तर देत नाही...' मुंबई हल्ल्यात RSS च्या भूमिकेच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती