क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

शुक्रवार, 17 जुलै 2020 (21:49 IST)
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने बलात्कार केला आहे. यामुळे पनवेल मधील क्वारंटाईन सेंटरची सुरक्षा धोक्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला.
 
संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याचा खुलासा करण्यात आला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती