डॉ दत्ता यांनी सांगितले की दिसायला ती महिला सारखी आहे. तिचा आवाज, स्तन, सामान्य जननांग इतर सर्व काही महिलेप्रमाणे आहे. तसं तर तिच्या जन्मापासूनच तिच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय नाही. तिला कधी मासिक पाळी आली नाही. त्यांनी म्हटले की ही एक दुर्लभ स्थिती असून सहसा 22,000 लोकांपैकी एकात आढळते.
डॉ दत्ता यांनी म्हटले की त्या महिलेवर केमोथेरपी केली जात असून तिची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी म्हटले की एका स्त्रीप्रमाणे मोठी झाली आणि एका पुरुषासोबत सुमारे एक दशक वैवाहिक जीवन जगत आहे. सध्या आम्ही रुग्ण आणि तिच्या पतीची काउंसलिंग करत आहोत आणि समजविण्याचा प्रयत्न करत आहोत की पुढे देखील ते सामान्य प्रकारे आपलं आविष्य जगू शकतील.