पुण्यातील येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाले

मंगळवार, 16 जून 2020 (08:19 IST)
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाल्याची माहिती समोर आली आहे. आकाश पवार आणि अर्शद सय्यद अशी पळून गेलेल्या आरोपीची नावं आहेत.
 
येरवडा जेल लॉकडाऊन असल्याने शेजारच्या वसतिगृहात आरोपींना ठेवलं जात आहे. मात्र तिथूनच शौचालयाचा बहाना करून आरोपी पळाले. पळून गेलेले दोघेही पुणे जिल्ह्यातील असून एकजण 307 तर दुसरा 392च्या गुन्ह्यातील आरोपी आहे. बार्टीच्या मागासवर्गीय वसतिगृहात सध्या बाहेरून येणाऱ्या आरोपींना ठेवलं जात आहे. कारण कोरोनामुळे येरवडा जेल लॉकडाऊन आहे. बाहेरच्या आरोपींना जेलमध्ये सध्या एन्ट्री नाही. कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील 8 कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे.
 
राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक, नागपूर ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती