पुण्यात आत्मनिर्भर पेट्रोल पंप सुरू

शनिवार, 13 जून 2020 (16:34 IST)
पुण्यातील पेट्रोल पंपावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहक स्वत:च्या हातानेच पेट्रोल भरत आहेत. पुण्यातील आरटीओ चौकातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर आत्मनिर्भर उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्राहक स्वतःच्या हाताने हवे तेवढे पेट्रोल भरू शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तर टळेल मात्र ग्राहकांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत बारा तास पेट्रोल पंप सुरू असतं. 
 
गेल्या तीन दिवसांपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात अशा पद्धतीने प्रथमच आत्मनिर्भर पेट्रोल पंप सुरू झाल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं.ग्राहकाला सर्वप्रथम पेट्रोल कसं भरायचं याबाबत मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर सॅनिटायझरनं हात स्वच्छ  करण्याची सूचना दिली जाते. याबाबत संपूर्ण माहितीचे फलक लावण्यात आलेत. त्यानुसार पेट्रोल-डिझेल भरल्यानंतर ग्राहकांची फसवणूक टळत आहे आणि सोशल डिस्टन्स मेंटेन केलं जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती