मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या 1 जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पायाच्या आजाराने त्रस्त आहे. ते 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, मात्र त्यांच्या पाय दुखू लागल्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले आणि उद्या त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे.
पुण्यात घेतलेल्या सभेत त्यांनी पायाचा कोणता आजार झाला आहे, हे सांगितले त्यांनी सांगितले की कामानिमित्त पुण्यात येत असताना वाटेत त्यांचे पाय दुखू लागले प्रचंड वेदनेमुळे मुंबईला परतावे लागले आणि काही चाचणी केल्यावर डॉक्टरांनी हिपबोनची शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. आता उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार. त्यांच्या विश्रांतीच्या काळात मनसेचे पदाधिकारी आणि नेते राज्यात विधानसभा स्तरावर जाहीर सभा आणि परिषदा घेतील.असे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सांगितले.