ठाण्यातील कारखान्याला भीषण आग, सिलेंडरच्या स्फोटाने परिसर हादरले

रविवार, 29 मे 2022 (11:24 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वागळे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात शनिवारी रात्री एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली. आगीचे कळतातच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आग भीषण आहे. या परिसरातून 7 ते 8 वेळा मोठे स्फोट झाले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
 
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडर ठेवलेल्या कारखान्यात आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. त्यामुळे आग अधिकच वेगाने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. कारखान्याजवळ राहणारे लोक घराबाहेर पडले. अधिका-यांनी सांगितले की आग विझवण्यासाठी आरडीएमसी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांसह दोन अग्निशमन दलांना सेवेत लावण्यात आले आहे.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती