मोठा दिलासा : महिलांसाठी मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:25 IST)
अखेर आजपासून महिलांसाठी मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना याबाबत घोषणा केली आहे. आजपासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्यादरम्यान आणि सायंकाळी सात नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
 
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आले होते. तसे परिपत्रक काढले होते. मात्र, रेल्वेकडून खोडा घालण्यात आला होता. भाजपने या वादात उडी घेत राज्य सरकारवरच टीका केली. दरम्यान, आम्ही सकारात्मक असल्याचे मध्य रेल्वे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. रेल्वेकडून कुठलाही विलंब नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तर दुसरीकडे राज्य सरकार म्हणतेय रेल्वेकडूनच ग्रीन सिग्नल मिळत नाही.  महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत रेल्वेला पुन्हा पत्र पाठवले आहे. रेल्वे तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवणही या पत्राद्वारे मुख्य सचिवांनी करून दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती