मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, नवी नियमावली जाहीर

बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (17:17 IST)
राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. त्यासोबतच अनेक सेवा नियमावली निश्चित करून पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यात आता मेट्रो रेल्वेबाबत अत्यंत मोठी बातमी राज्य सरकारने दिली आहे.
 
राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवं परिपत्रकानुसार ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. 
 
दरम्यान राज्य सरकारकडून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.
 
सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती