महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत मुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून मोठा गोंधळ उडाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेकांनी लोकल ट्रेनही थांबवल्या आहेत. अनेक लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून निदर्शने केल्याचे सांगण्यात आले.आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिक करत आहे.चिमुकलींना न्याय मिळावा या साठी नागरिकांनी, पालकांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.लोकांनी शाळेचे गेट तोडले आहे पोलिसांवर दगडफेक केली आहे. शाळेत शिरून नासधूस करत आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापक आणि आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे वृत्त आहे. मात्र, या घटनेविरोधात लोकांचा रोष उफाळून आला. शेकडो लोकांनी जमून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. सकाळी 8 वाजता लोकांनी लोकल गाड्या थांबवून गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाचे आदेश दिले. मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत पोलिसांच्या दक्षतेबाबत निवेदन दिले
हा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला होता. यानंतर याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आणि आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला अटक करण्यात आली. शाळेच्या व्यवस्थापनाने सोमवारी या घटनेवर एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, मुख्याध्यापकांसह, एका वर्ग शिक्षक आणि एका महिला मदतनीसला देखील निलंबित केले आहे. शाळेने या घटनेबद्दल माफीही मागितली आहे.