सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी एका नव्या संशयिताला ताब्यात घेतले, चौकशी सुरु

Webdunia
शनिवार, 18 जानेवारी 2025 (17:19 IST)
अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. अद्याप या बाबत मुंबई पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी हिरसाळ मध्ये अटक केलेल्या संशयिताला पोलिस ठाण्यात आणले असून त्याची चौकशी सुरु आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मुंबईतील वांद्रे भागात त्यांच्या घरातशिरुन हल्ला करण्यात आला. या घटनेतील आरोपीला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. 

पोलिसांचे पथक वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानाभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे. असे असतानाही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक का करू शकली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी 35 पथके तयार केली असून संशयित आरोपीं अद्याप मोकाट आहे. 
ALSO READ: सैफ अली खान हेल्थ अपडेट समोर आली, रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार डॉक्टरांनी सांगितले
सैफ यांच्यावर 15 जानेवारीच्या रात्रि सैफवर हल्ला केला त्यांच्यावर सहा ठिकाणी वार करण्यात आले असून त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयातील आइसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्यांना सामान्य वार्ड मध्ये हलवले आहे.   
पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी 20 पथके तयार केली असून, शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. हल्लेखोराला शेवटचे वांद्रे रेल्वे स्थानकावर पाहिले होते.

सैफच्या घरातील मोलकरणीने पोलिसांना सांगितले की, घटनेदरम्यान हल्लेखोराने तिच्यावर हेक्सा ब्लेडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने त्याला एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. निवेदनानुसार, जेव्हा तिने घुसखोराला काय हवे आहे असे विचारले तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले, “मला एक कोटी हवे आहेत.”
या वर करीना कपूर यांनी हा काळ त्यांच्या कुटुंबियांसाठीअत्यंत आव्हानात्मक असे म्हटले आहे. तर मीडिया आणि चाहत्यांना गोपनीयता राखण्याची विनंती केली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख