मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ठाण्यात पिरियड रूम

सोमवार, 11 जानेवारी 2021 (09:45 IST)
ठाणे- महाराष्ट्रातील मुंबईच्या जवळ ठाण्यातील झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी एक 'पिरियड रूम' तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालयात बनवलेली ही पिरियड रूम महिलांसाठी खूप मोलाची ठरणार.
 
सार्वजनिक शौचालयात असा कक्ष बनण्याचा हा पहिलाच प्रयोग असून यात एक कमोड, जेट स्प्रे, टॉयलेट रोल होल्डर, साबण, पाणी आणि डस्टबिन यांची व्यवस्था आहे. ठाणे महापालिकेनं एका स्वयंसेवी संस्थेसोबत एकत्र येत हा कक्ष बनवला आहे. या सोमवारी वागळे इस्टेटच्या शांतीनगर भागातला हा कक्ष महिलांसाठी खुला केला गेला.
 
या कक्षाच्या बाहेरील भिंतींवर आकर्षक रंग देण्यात आला असून मासिक पाळीच्या दरम्यान काय करावं याचा संदेश देणारी चित्रंही काढलेली आहेत. महापालिकेची ठाणे शहरातल्या सर्व 120 टॉयलेट्समध्ये असे कक्ष बनवण्याची तयारी सुरु आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती