आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरूपात

बुधवार, 7 एप्रिल 2021 (09:04 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
 
कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गांसह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळीही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
 
शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात मिळणार असली तरी या थाळीच्या किमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच 5 रुपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती