नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य सापडले

सोमवार, 29 मार्च 2021 (09:38 IST)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळालं. यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असून, दुसऱ्यांदा न्यायालयाने एनआयएकडे ताबा दिलेला आहे.
 
एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या. या अगोदर  एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती