कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित कसे ठेवावे

शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (12:22 IST)
आम्ही आपल्या महत्त्वाच्या कागदांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या बॉक्समध्ये ठेवून त्यावरून टाळा लावतो पण ती कागदपत्रे डिजीटल असल्यास आणि त्या फाइल्स कॉम्प्युटरमध्ये असल्यास काय करावं ? 
 
ऍपलच्या मॅक OS आणि विंडोज OS दोन्हीच्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये डेटा इन्क्रिप्ट करण्यासाठीची साधने प्रीलोडेड आहेत. यूजर्स आपल्या सामान्य खात्याने आणि पासवर्ड ने त्याला लॉक आणि अनलॉक देखील करू शकतात. या व्यतिरिक्त यूजर्स आपले दुसरे पासवर्ड देखील सेव्ह करू शकतात.
 
मॅक OS - 
ऍपलच्या मॅक OS वापरणारे यूजर्स फाइल वॉलेट फीचर ला सक्रिय करू शकतात. या साठी सर्वप्रथम System Preferences मध्ये जावं. तिथे आपल्या Security & Privacy असे मिळेल. त्यावर क्लिक करावं. या नंतर आपण FileVault फीचर वर जाता. या मध्ये यूजर आपल्या हार्ड ड्राइव्ह चा सर्व डेटा इन्क्रिप्ट करू शकतात. आपणास USB किंवा पेन ड्राइव्ह मध्ये असलेल्या डेटा ला सुरक्षित ठेवायचे असल्यास आपल्या ला राईट क्लिक करावे लागणार, त्या नंतर आपल्याला Finder वर क्लिक करून Encrypt निवडावे लागणार.
 
विंडोज OS 
मॅक ओएस पेक्षा विंडोज वर फाइल्स ला इन्क्रिप्ट करणं थोडं कठीण आहे. काही संगणक किंवा कॉम्प्युटर स्वतःच फाइल्स इन्क्रिप्ट करतात. याची तपासणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या सेटिंग मध्ये जावे लागणार. नंतर सिस्टम चे निवड केल्यावर 'अबाउट' वर क्लिक करावं. आता खाली स्क्रॉल करा आणि Device Encryption वर क्लिक करा. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये हे फीचर नाही आहे तर विंडोज या सारखेच आणखी एक फीचर देतं, त्याचे नाव आहे 'बिट लॉकर'. या बिट लॉकर चा वापर करण्यासाठी आपण कंट्रोल पॅनल मध्ये जावे या नंतर सिस्टम ऍड सिक्योरिटी वर क्लिक करा. नंतर स्क्रीन वर दिसत असलेले Manage BitLocker वर क्लिक करावं. बिट लॉकर एक्स्टर्नल ड्राइव्ह सह पेन ड्राइव्ह चा डेटा देखील इन्क्रिप्ट करून देतो. 
 
क्लाउड स्टोरेज म्हणजे काय -
मोबाईल, कॉम्प्युटर आणि पेन ड्राइव्ह मध्ये जो डेटा आपण संग्रहित किंवा स्टोअर करतो ते डेटा स्टोरेज चे डिजीटल माध्यम आहे. क्लाउड स्टोरेज डेटा स्टोअर करण्याचं वर्च्युअल माध्यम आहे. या मध्ये डेटा आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरच्या लोकल ड्राइव्ह मध्ये नसतं. आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरचा डेटा एखादा दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हर मध्ये संग्रहित केला असतो. आणि आपण या डेटा ला बऱ्याच माध्यमांद्वारे ऍक्सेस करू शकताया डेटा चे व्यवस्थापन होस्टिंग कंपनी कडे असतं. या मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी ऍप्लिकेशन वापरले जाते. क्लाउड स्टोरेज मध्ये स्पेस कंपनी देते.
 
बिट लॉकर ने पेन ड्राइव्ह लॉक करा - 
पेन ड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क वर पासवर्ड सेट करण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये 'स्टार्ट' वर क्लिक करा. त्यानंतर कंट्रोल पॅनल वर जावं. इथे आपल्याला उजवीकडे वरील बाजूस 'व्यू बाई' लिहिलेले दिसेल, या वर क्लिक करून 'लार्ज आयकन' निवडा. या नंतर BitLocker Drive Encryption वर क्लिक करावं. एक नवीन स्क्रीन उघडेल त्यामध्ये कॉम्प्युटरशी निगडित ड्राइव्स दिसतील. त्यामध्ये 'पेन ड्राइव्ह' चे पर्याय देखील असणार. त्यासमोर bit locker असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करावं असे केल्यास एक नवी विंडो स्क्रीन उघडेल, ज्या मध्ये आपल्याला पेन ड्राइव्हसाठी पासवर्ड टाईप करावे लागणार. त्या नंतर आपल्याला स्क्रीन वर नेक्स्ट चे पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं आणि पुढे जा. आता स्क्रीन वर दोन पर्याय येतील त्यामध्ये वरील बाजूस save the password लिहिलेलं असेल ते निवडा. या नंतर यूजर्सची पेन ड्राइव्ह सहजरीत्या सुरक्षित होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती