कोरोना व्हायरस : आपण हॉटेलमध्ये जात असल्यास ही नियमावली जाणून घ्या

बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (15:50 IST)
कोरोना व्हायरसमुळे जणू धावत्या आयुष्याला विरामच लागला आहे, पण आता हळू-हळू आयुष्य परत रुळांवर येत आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स हळू-हळू सामान्य माणसांसाठी उघडले जात आहे. अश्या परिस्थितीत जर का आपण कुठेतरी फिरायला जात असाल तर कोरोनाच्या काळात आपल्या खबरदारी आणि सुरक्षितपणे पुढे जायचे आहे. जेणे करून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकाल. या साठी आपल्याला काही नियम माहीत असणे गरजेचे आहे.
 
हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये प्रवेशासाठीच्या अटी -
* कोणते ही हॉटेल आणि रेस्टॉरंट्स स्वतःच्या 50 टक्के आसनी क्षमतेसह उघडणार.
* ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाही त्यांनाच आत प्रवेश करता येईल म्हणजे प्रवेश द्वारातच थर्मल स्कॅनिंग करणं अनिवार्य असणार.
* हॉटेल मध्ये येणारे अतिथी, कर्मचारी आणि सामानासाठी प्रवेश आणि निर्गमन स्वतंत्रपणे ठेवावं लागणार.
* या व्यतिरिक्त गाडीचे दार, हॅन्डल, स्टियरिंग आणि चावी देखील सेनेटाईझ करण्यात येणार. 
* पार्किंग मध्ये ग्राहक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यात सामाजिक अंतराची काळजी घ्यावी लागणार.
 
हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या आतील बाजूस घ्यावयाची काळजी -
* डिस्पोझेबल नॅपकिन्स वापरण्यात येतील.
* ग्राहकांमध्ये किमान 6 फुटाचे अंतर राखणे आवश्यक आहे. 
* मुलांच्या खेळाचे क्षेत्र बंद असणार.
* सर्व वेटर किंवा इतर कर्मचारी फेस शील्ड, मास्क आणि ग्लव्ज वापरतील.
 
हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये लोकांसाठी महत्त्वाच्या पळावयाच्या गोष्टी-
* एकमेकांपासून किमान 6 फुटाचे सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
* कुठेही थुंकू नका. स्वच्छतेची काळजी घ्या. 
* आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करून ठेवा.
* सेनेटाईझरचा वापर वेळोवेळी करत राहा.
* मास्क आवर्जून वापरा.
* जेवण्याच्या पूर्वी आणि जेवण्यानंतर आपले हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करा.
* खुर्ची आणि टेबलाला स्पर्श करू नका. जर चुकून देखील हात लागले असतील तर आपल्या हाताला सेनेटाईझ करा.
* आपल्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा हात लावणं टाळावं. हेच मुलांना देखील समजावून सांगावे.
* खुर्ची -टेबलाला स्पर्श करू नका. वॉशरूमच्या हॅण्डल आणि बेसिनला स्पर्श केल्यानंतर आपल्या हाताला सेनेटाईझ अवश्य करा.
* गरम अन्नच खा.
* घरी परत आल्यावर स्वतःला चांगल्या प्रकारे सेनेटाईझ करा. 
 
हॉटेल मध्ये राहणार असल्यास अशी काळजी घ्यावी -
* स्वच्छतेची काळजी घेणारी हॉटेलचं बुक करा.
* नगदी व्यवहार कमीतकमी करा.
* हॉटेलात जेवताना सॅलड खाऊ नका. चांगले आणि गरम जेवणच करावं.
* फास्ट फूड पासून लांबच राहा.
* कोरोना काळात एसी रूम घेऊ नका.
* खोलीचे दार आणि खिडक्या उघडून ठेवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती