आमदार अनिल पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोटावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अनिल भाईदास पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अतिशय अटीतटीची ती लढत ठरली होती. शिवाय, अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी चांगले स्थान मिळवले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor