मुंबईत 24 तासांत 5,000 नवीन रुग्णांची भर, उच्चांक गाठला,432 इमारती सीलबंद

गुरूवार, 25 मार्च 2021 (11:55 IST)
मुंबईत कोरोनाचा कहर झाला असून येथे 24 तासांत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारावर पोहचली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत 5067 रुग्णांची नोंद झाली आहे. 
 
पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आकड्यावरून कहर लक्षात येत आहे. मुंबईतील कोरोना संसर्ग झोपडपट्टीतऐवजी उच्चभ्रू परिसरात शिरकाव करत आहे. येथील 432 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. अंधेरी भागाकडे केसेस वाढत असून अनेक सेलिब्रिटीज याला बळी पडत आहे. 
 
मुंबईत कोरोनाचे डबल म्युटेशन वेरिएंटचे 21 रुग्ण सापडले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 
परिस्थिती बघता शहरात सार्वजनिक व खाजगी ठिकाणांवर होळी सण साजरा करण्यास मनाई केली गेली आहे. तसेच अधिकारी सार्वजनिक स्थानांवर रॅपिड एंटीजन टेस्ट (आरएटी) देखील करतील.
 
होळीचा सण साजरा न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा चाचणी नाकारणार्‍यांना महामारी रोग अधिनियम किंवा रोग प्रबंधन अधिनियम अंतर्गत आरोपित केले जाईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास लॉकआऊट करण्याचा इशारा दिला आहे.
 
महाराष्ट्र हे देशाचे असे राज्य आहे जिथे कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. येथे नवीन केसेस आल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. राज्यात 2.3 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत 53,000  पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती