मुंबई : दिवाळीतील रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषणात (Mumbai Pollution) मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Global air quality index) शुक्रवारी (दि.5) मुंबई जगातील 7 वे प्रदूषित शहर ठरले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 169 नोंदवला गेला आहे. त्यानुसार मुंबई शहर (Mumbai City) हे जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.
पहिल्या क्रमांकावर 426 हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्ली शहर (Delhi City) आहे. दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता (Kolkata) शहराचा देखील प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश आहे. गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजे 162 नोंदवला गेला. तर कुलाबा 290 आणि बीकेसी 290 हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला होता. नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक 118, अंधेरी 135, बोरिवली 142, चेंबूर 162 सह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक 95 सह समाधान कारक नोंदवला गेला. मात्र मुंबईत शनिवारी पुन्हा एकदा प्रदूषणाची (Global Air Quality Index) पातळी वाढली आहे.